प्रिय जयंतराव,

प्रामाणिक मत देतो आहे. राग मानू नये.:)

कल्पना चांगली आहे.पण कविता ठीक आहे. काही बरेच ठिकाणी शब्दाळ झाली आहे. अनेक वाक्ये बंबाळली आहेत असे मला वाटते. मी त्या शब्दांना, वाक्यांना बदलून गाळून माझ्या सुचवण्यांसकट कविता खाली दिली आहे. आदानप्रदान व्हावे.



सकाळी, सकाळी
दाराखालून माझ्या घरात
सरकत येतं वाळवंट
वर्तमानपत्राचं...
पाना-पानावर रक्तपात,खून,दंगली,स्फोट,जाळपोळ,
अन्याय,अत्याचार,आत्महत्या,बलात्कारांची
तापलेली वाळू
भाजून निघतात
नजरेला फिरवता-फिरवता
माझ्या डोळ्यांचे तळवे

पण मग टाचेवर चालणाऱ्या डोळ्यांना
अचानक तिसऱ्या पानावर गवसतं
'पेज थ्री' नावाचं एक ओऍसिस
ज्यावर सुखशीतल गारवा असतो आणि
या बेटावर चालू असते 'पार्टी'नामक
एक 'उत्सव' अहर्निश,
जिथे तंग कपड्यातल्या मादक ललना हसत खेळत
बिलगत असतात
हातात फेसाळत्या मद्याचे प्याले मिरवणाऱ्या
लक्षाधीश,मस्तवाल पुरुषांना!

या बेटाच्या गावीही  नसते
भोवतालचे तापलेले वाळवंट...
मी तिरिमिरीने भिरकावून देतो
ते वाळवंट डोळ्यांतून
आणि डोक्यांतूनही

आणि ठरवतो पुन्हा
उद्याच सांगायचे त्या पेपरवाल्या छोऱ्याला
'उद्यापासून घरी टाक सिर्फ 'पेज थ्री' !

(आणि टाक तापलेली वाळू माझ्या शेजाऱ्याकडे
 नाहीतरी फुकट्या रोज नेतो
माझंच वर्तमानपत्र नेतो वाचायला!)

(जयन्ता५२)