"समुद्राच्या पाण्यावर शेती..." ह्यावरुन मुंबई उपनगरी रेल्वेरुळांलगत चालणारी/दिसणारी शेती आठवली. मला विषयाचे गांभीर्य अजिबात घालवायचे नाही. पण, ही रेल्वेरुळांलगत पालेभाजीची शेती नाले, गटारे यामधून उपसा केलेल्या पाण्यावर चालते हे असंख्य मुंबईकरांनी असंख्य वेळा पाहिले आहे. असे जे पाणी भाज्या, फ्ळांद्वारे आपल्या शरीरात जाते ते कितपत हानीकारक/अपायकारक आहे? महानगरे, शहरे, गावे यातून सांडपाणी/मलनिःसारण हे नाले/नदी द्वारे समुद्रामध्येच विसर्जित केले जाते.
तेव्हा असा अपारंपारिक मार्ग योग्य पर्याय ठरेल का याचा सांगोपांग विचार व्हावा असे मला वाटते.