द्रौपदिने कर्णा सारखा पती स्वत: होउन घालवला. 
स्वयंवरात मुलीला वर निवडण्याचा अधिकार अध्याहृत आहे.तशात,स्वयंवराच्या आधीच धृष्टद्युम्नानाने स्पष्ट म्हटले होते 'कुलेन रूपेण बलेन युक्त: तस्याद्य भार्या भगिनी ममेयम्'.तरीही कर्ण पुढे झाला आणि स्वत:चा 'नाहं वरयामि सूतम्' असा अपमान करून घेतला. स्वयंवराच्या घोषित निकषांनुसार आपण पात्र नाही हे ठाऊक असताना त्याला धनुष्यास हात घालण्याची काय गरज होती?त्या काळचं सोडा, अगदी आजही विवाहाच्या किंवा नोकरीच्या जाहिरातींमध्ये उमेदवाराची अपेक्षित अर्हता दिलेली असते.ती पूर्ण न करणारा कोणी मुलाखतीस घुसला तर त्याचा कोणता सन्मान केला जातो?अकारण उदात्तीकरण केव्हाही वाईट - मग ते द्रौपदीचे असो वा हल्लीच्या फॅशनप्रमाणे कर्णाचे!

छिद्रान्वेषी