सांडपाण्यात भौतिक, रासायनिक व जैविक असे तीन प्रकारचे टाकाऊ घटक असतात. यातील मानवी आरोग्याच्या दृष्टीने रासायनिक आणि जैविक घटक महत्वाचे. विविध विषारी रसायने, जड धातू जर या पाण्यातून या पाण्यावर वाढवलेल्या भाज्यांमध्ये जात असतील तर ते नक्कीच हानीकारक ठरतील. तीच गोष्ट हानिकारक जीवाणूंची.पण केवळ सांडपाण्यावर वाढवलेली म्हणून एखादी भाजी टाकाऊ किंवा हानीकारक आहे, असे मात्र मानता येणार नाही.