नवोदित पाहुण्या क्रिकेट संघाच्या विमानतळावर बॅगा उचलणाऱ्या आणि नंतर
परिचयात "आय युजड टू बॅट अ बिट" असे म्हणणाऱ्या डॉन ब्रॅडमनची आठवण येते.
आणि " आय ऍम डॉ. सो ऍन्ड सो, ऍन्ड आय ऍम अ प्रोफेसर ऑफ फिजिक्स" यावर "आय
ऍम अल्बर्ट आईन्स्टाईन, ऍन्ड आय ऍम अ स्टुडन्ट ऑफ फिजिक्स" हे उत्तरही
आठवते!
ब्रॅडमन, आइनस्टाइन, वगैरे महान माणसे आहेत. माझा एक मित्र भौतिकशास्त्राचा विद्यार्थी आहे. तो ही विनम्र आहे, विनयशील आहे. पण हुशार-बिशार नाही. ढ च म्हणा. "आय ऍम आनंद रिसबूड, ऍन्ड आय ऍम अ स्टुडन्ट ऑफ फिजिक्स" असे त्याने एकदा उत्तर दिले होते. तेव्हा तू काय स्वतःला आइनस्टाइन समजतोस का असा खोचक सवाल त्याला केला गेला होता.
बिच्चारा आनंद. त्या मूर्खाला अशी विनयशीलता, विनम्रता आइनस्टाइनला शोभते, हे त्याला माहीत नव्हते.
आम्ही लोक फक्त हुरळून जाऊन त्याचे गोडवे गायचे. फॅशनेबल वक्तव्याची फॅशनेबला पूजा करायची असते. आम्ही लोक ह्यातच खपलो, खपतो आहे.