महेश, नितिन, योगी, प्रकाश आणि मी मराठी, तुमचे मनापासून आभार. तुम्ही दिलेल्या इतर संकेतस्थळांवरची माहिती सुद्धा खूप उपयोगी आहे.
मी आता एक c program लिहून पहाते देवनागरी अक्षरे उमटतात का. :-)
द्वारकानाथ, आपण मनोगत मधून मराठीतून संदेश पाठवतो ही एक मोठीच सोय आहे नाही का? सध्या प्रशासकांनी आपल्याला ही सेवा मोफत दिली आहे. तीच पुढे व्यावहारिक तत्वावर सुरू करण्याची आपली कल्पना चांगली आहे.
इथे मराठीतून लिहिलेला मजकूर असाच आपल्या नेहमीच्या (outlook वगैरे मधल्या) संदेशातही वापरता येतो. (मी आताच प्रयोग करून पाहिला!)