यातला सर्वात मोठा अडसर समुद्रातले क्षार आहेत असे वाटते. अश्या पाण्यामुळे शेतजमीन निकामी होऊ शकते.
त्याऐवजी समुद्रात नैसर्गिकरीत्या उगवू शकणाऱ्या वनस्पतींचा आहारातला वापर वाढवणे हा एक प्रभावी उपाय होऊ शकतो. अश्या वनस्पतींची समुद्रात शेती करणे फार अवघड असेल असे वाटत नाही. अश्या प्रकारची शेती जगात इतरत्र केली जात असावी असे वाटते. अर्थात या शेतीलाही वादळे, तेलगळती अश्या गोष्टींपासून धोका आहेच. तसेच या उपायाने सध्या होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी/बंद व्हायला फार उपयोग होईल असे वाटत नाही.