गेल्या महिन्यात लेक डिस्ट्रिक्ट फिरून आले. अतिशय सुंदर आहे. डोंगर चढणाऱ्या, चालायची आवड असणाऱ्या लोकांसाठी पर्वणी. छोट्या टेकड्यांवरून दिसणारी निळीशार तळी, आणि या ऋतूत हिरवाई. लेक डिस्ट्रिक्टला "कवींचा परगणा" म्हणतात इतक्या कविता इथे लिहिल्या गेल्या आहेत! विल्यम वर्डस्वर्थचे घर, त्याने डॅफोडिल्स लिहिली ती जागा (!), त्याची कबर याच भागात आहे.

विंडरमिअर, केसिक (Kesswick) ही त्यातल्या त्यात मोठी गावे आहेत. मी ग्रासमिअर गावात राहिले होते. केंब्रिजहून बर्मिंगम, तिथून ऑक्सेनोम (Oxenholme), आणि तिथून विंडरमिअर अशी आगगाडी. विंडरमिअरहून बस. पब्लिक ट्रान्स्पोर्ट(?)ची चांगली व्यवस्था आहे. राहायच्या जागा मात्र महाग आहेत आणि पुष्कळ आधी राखून ठेवाव्या लागतात. आणखी माहिती, मदत हवी असल्यास व्य. नि. पाठवावा.