प्रतिसादांबद्दल सर्वांनाच मनःपूर्वक धन्यवाद.
शशांक,
आपण केलेल्या 'गझलची बाराखडी'तल्या खुलाशाबद्दल आपले आभार. वेगवेगळ्या विषयांचे शेर असलेल्या ग़ज़लेला 'ग़ैर-मुसलसल' ग़ज़ल म्हणतात, आणि एकाच विषयाशी संबंधित असल्यास 'मुसलसल' ग़ज़ल म्हणतात असंही वाचल्याचं आठवतंय. अर्थात, प्रत्येक शेर हा स्वयंपूर्ण कविता असणं हे दोन्ही प्रकारांत आवश्यक आहे. (हे सगळं माझं वाचलेलं किंवा ऐकीव ज्ञान!)
नंदन / शैलेश,
आपल्या पुनः दिलेल्या सुंदर प्रतिसादांबद्द्ल (मोती / हार) पुनश्च धन्यवाद!
वैभव,
हा मीटर (किंवा ही बहर / हे वृत्त) मला स्वतःलाही खूप आवडतो; पण कठीणही वाटतो.
अनेक सुंदर गझला याच वृत्तात आहेत. उदा.
(१) राहिले रे अजून श्वास किती?
जीवना ही तुझी मिजास किती? (कै. सुरेश भट)
(२) दिल में इक लहर सी उठी हैं अभी
कोइ ताज़ा हवा चली हैं अभी (गायक - ग़ुलाम अली)
इथे उर्दू नियमांप्रमाणे में / हैं 'पडतात' (लघु होतात - मात्रा १).
(३) ढल गया आफ़ताब ऐ साकी
ला पिला दे शराब ऐ साकी (गायक - जगजीत)
(४) जिंदगी यूं हुई बसर तनहा
काफ़िला साथ हैं सफ़र तनहा (ग़ुलज़ार / जगजीत)
(५) एक परवाज़ दिखाई दी हैं
कोइ आवाज़ सुनाई दी हैं (ग़ुलज़ार / जगजीत)
या वृत्ताचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे केरवा आणि दादरा दोन्ही तालांत हे बांधता येतं. वर पैकी (४) आणि (५) या गझला 'मरासिम' मधे लागोपाठ आहेत. पहिली केरव्यात आणि दुसरी दादऱ्यात. इथे संगीतकाराची प्रतिभा किती महान आहे तेही जाणवतं.
प्रवासीपंत,
बऱ्यांच दिवसांनी तुमची प्रतिक्रिया पाहून बरं वाटलं.
हो - मी महिन्यात २ लिखाणंच मनोगतवर टाकायची (प्रतिसादांव्यतिरिक्त) हा स्वतःपुरता नियम घालून घेतला आहे. (अर्थात, माझं लिखाणही एवढं जास्त नाही की खूप जास्त वेळा लिहिता यावं.)
- कुमार