आपल्या म्हणण्याला दुजोरा देत पुढं असंही नमूद करावसं वाटतं की मराठीत एखादा चांगला मराठी समशब्द कोशाची (थेसॉरसची)निर्मिती होणंही आवश्यक आहे.
माझ्या माहितीत असे दोन समशब्द कोश आहेत. दोन्हींचंही नाव 'शब्द्कौमुदी' असंच आहे. यातला पहिला यशवन्त बळवन्त पटवर्धन यांनी तयार केलेला आहे. नीळकंठ प्रकाशननं १९६५ साली याची पहिली आवृती काढली होती. माझ्या माहितीप्रमाणे दुसरी आवृत्ती निघालेली नाही आणि आज कुठल्याही दुकानात हा उपलब्ध पण नाही. मराठी लिखाणासाठी मर्यादित स्वरूपात (शब्द संख्या कमी असल्यामुळे) हा अतिशय चांगला आणि उपयुक्त कोश आहे. दुसरा कोश मो वि भाटवडेकरांनी तयार केलेला आहे. याची शब्द्संख्या खूप मोठी आहे परंतू लिखाणाच्या दृष्टितून पटवर्धनांचा कोश जास्त उपयुक्त वाटतो.
याशिवाय एखादा शब्दकोश कुणास माहित असल्यास कृपया माहिती द्यावी.
- मिलिंद