दर वेळी असे सांगितले जाते की, अजून "मागसर्वगीय" लोकांचे पुर्नवसन झाले नाही आणि म्हणून हे आरक्षण चालू ठेवले पाहिजे. आहो पण किती दिवस? या सगळ्या प्रकारात भरडला जातात ते मध्यम वर्गीय आणि तरी ही "पुढार" जातीत जन्मलेले मुले/मुली. आहो म्हणजे पुढच्या १०० एक वर्षा नंतर या "मागास" झालेल्या लोकांसाठी आरक्षण चालू करावे लागेल. हे चक्र थांबवा हो.

दर वेळी हि तुलना केली जाते की, आरक्षण काढले की फक्त  पुढार मुलेच शिकतील. आहो आतची परिस्थिती पाहत फ़त्क्त श्रीमंत आणि आरक्षण असलेलीच मुले शिकू शकतील. आहो वाढलेल्या फीस, एतर खर्च कशे परवडणार हो "गरीब/मध्यम वर्गीय" आणि तरीही पुढार असलेल्या आई-बाबांना/मुला-मुलींना?? आहो श्रीमंताचे तर कसेही तरून जाते, बाकींच्या कडे "जात" हि नाहि आणि पैसा हि...

आणि हो तो "हजारो वर्षाचा" त्रास झाला/दिला त्याची हि भरपाई म्हणून जर हा उपाय असेल तर तो आताच्या "पुढार"गरीब/मध्यम वर्गीय"" पिढीवर अन्याय करून का? हाच नियम लावला तर आज भारतात येण्याय्रा प्रत्येक "ब्रिटिश" नागरिकांचा निषेध व्यक्त करून , त्यांच्या देशात "आपल्या" सगळ्यांसाठी आरक्षणाची मागणी केली पाहिजे, त्यांनी पण आपल्यावर अन्यायच केला आहे(होता) ना, आणि त्यामुळे-च तर आपण आज एतके मागास आहोत.

आहो "आरक्षण/जातीयता" या नुसत्या राजकारणी लोकांच्या गप्पा आहेत गप्पा(अंतु आठवा), त्यांना थोडीच याची झळ पोहोचणार आहे? ते सोडा नुसते आरक्षण सोडले तर "मागास" वर्गाच्या उन्नतीसाठी बाकी काय प्रयत्न केले आहेत हो यांनी? उगीच मतांसाठी राजकारण करायचे, आणि सामान्या जनता आहेच पाठिंब्या-ला. आपला लढा कश्या साठी हावा ते आधी ठरवले पाहिजे. पुढे येण्या साठी चांगले शिक्षण, शाळा हवी ना? आहो एथे प्राथमिक शाळेत विर्द्यांथ्यांची गाळती आहे, तिथे शिक्षणाची नीट सोय नाही आणि निघाले "उच्च शिक्षणात आरक्षण ठेवायला.

आहो खूप काही बोलायचे/लिहायचे आहे, पण गप्प आहे, काय माहीत आजच्या पुढार पिढी लाच काही पिढ्या नंतर आरक्षणाची गरज लागेल. आहो "मागास" आणि "पुढार" सगळ्यांनाच वाईट अनुभव आलेले आहेत.उगीच शेकडो वर्षाचा त्रास-त्रास म्हणत बसण्याला काय अर्थ आहे?