जरी खेळ वाटे अता संपलेला..
मुठी आज वळतो.. नव्याने पुन्हा...
जरी आज सुटती उसासे कुणाचे..
नवा श्वास भरतो ..नव्याने पुन्हा...
असे पान सुकले उन्हाने वनाचे..
उभा वृक्ष फुलतो ..नव्याने पुन्हा...
जरी अत्तराची कुपी सांडलेली..
तिचा गंध उठतो.. नव्याने पुन्हा
जरी पावसाने असे काव्य पुसले..
नवे काव्य रचतो.. नव्याने पुन्हा..
हे सगळे शेर दर्जेदार आहेत, खुप आवडले!
-मानस६