अनु, शशांक

आपण वेदश्रीच्या प्रतिसादावर दिलेल्या स्पष्टिकरणाबद्दल धन्यवाद.

वेदश्री

तुझ्याही प्रामाणिक अभिप्रायाबद्दल आणि पुढच्या खुलाशाबद्दल धन्यवाद.  कोणतंही लिखाण करताना लेखकाला मनापासून वाटत असतं की ते वाचकांना आवडावं.  अर्थात तयार होणारी कलाकृती कुणाला आवडते कुणाला नाही.  वाचकाचा तो वैयक्तिक हक्क असतो.  त्यामुळे त्याबाबतीत मला काही म्हणायचं नाही.  पण निदान माझी लेखनशैली तुला चांगली वाटली हे वाचून समाधान वाटलं.  तू नेहमीच देतेस तसेच प्रामाणिक / परखड अभिप्राय पुढेही देत रहा.

- मिलिंद