मुक्ता ,

सुमन कल्याणपूर यांचे प्त्र व्हावा ऐसा मधील जिथे सागरा धरणी मिळते  हे गाणे आपण ऐकले/पाहिले असेल.

यात एक ओळ आहे. बघुनी नभीची चंद्रकोर ती सागर ह्रुदयी उर्मी

ऊठती. हे देखील एक रूपकच आहे. पण या गाण्याचा अर्थ सांगण्याची वेळ आली आहे का? कारण अर्थ तसा सरळ आहे. आपणच लिहिले आहे की

मी एका कार्यक्रमात आशा भोसलेंना हॄदयनाथांसमोर या गाण्याचा अर्थ स्पष्ट करुन सांगताना ऐकले आहे. त्यानुसार हे एक प्रेमगीत आहे. चंद्र चाण्दणे हे सगळ प्रतिकात्मक आहे. गाण्याचा भाव लक्षात घेऊन त्याचा अर्थ जाणण्याचा प्रयत्न करावा.

याचाच अर्थ अनेकांना हा प्रश्न पडला असेल.  मग मलाही असा प्रश्न पडला असेल किंवा मी माझ्या पद्धतीने तो लावण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यात खिल्ली उडवण्यासारखे काय आहे?