लेख आवडला. जुन्या गाण्यांच्या आठवणी ताज्या झाल्या.

' जी माणसं १९५० ते १९७० या काळात इथल्या चित्रपट संगीताशी पार गाण्यापासून ऐकण्यापर्यंत संबंधित होती, ती संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात सर्वाधिक भाग्यवान असावीत'

हे अगदी पटलं.

मी पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पुण्यात 'म्युझिक सेंटर' नामक प्रकार अस्तित्वात होता. आपल्याला हवी ती गाणी पैसे देऊन तिथे ऐकायला मिळत असत. मधूनमधून आम्ही मैत्रिणी भली मोठी यादी घेऊन तिथे जात असू. मग तिथला माणूस आम्ही सांगितलेल्यापैकी मिळतील त्या ध्वनिमुद्रिका रेकॉर्ड प्लेअरवर लावत असे.  एकदा आम्ही कारवाँ गुजर गया पाठोपाठ तीन वेळा ऐकलं होतं!

('मल्हार' मधलं 'बडे अरमानोंसे रक्खा है बलम तेरी कसम' हेही गाणं राहिलंच की!)

-मीरा