अमित,
छान !पोटाचा, जिभेचा, जिव्हाळ्याचा आपुलकीचा ........ चा विषय निवडलास! खूपच उपयुक्त माहिती दिलीस. मी पण आहारशास्त्राच्या बाबतीत जागरूक आहे . आजूबाजूला दोन-तीन उदाहरण पाहिल्यावर असे वाटते की फार या गोष्टीचा बाऊ न करता जेवावे व जेवणातला आनंद घ्यावा.मी माझा साक्शात्कारी हृदय रोग पुस्तक वाचले. खूपच छान पुस्तक आहे. पण ते पुस्तक वाचल्यावर श्रीखंड खाऊ शकत नव्हते. असो! शाकाहारी ब्राम्हणी आहार समतोल असतो अस मला वाटत. मी मालती कारवारकरचे अनेक लेख खूप दिवसांपूर्वी वाचले आहेत. त्यातल्या काही माहिती आठवते कारण त्या मी पाळते उदा खिचडी चांगली असते बिहारमध्ये शनिवारी खिचडी खाणे शुभ मानतात म्हणून तिथे शनिवारी खिचडी करतातच. ते शास्त्र मी इथेही पाळते. मिश्र धान्य खावीत. थालीपीटाच्या भाजणीत सोयाबीन, कुळीथ असेही धान्य घालते. तसेच वरण ज्याप्रमाणे हळदीशिवाय करत नाही त्याप्रमाणे मेथ्या घातल्याशिवाय करत नाही.
माझा मामा ७७ वर्षाचा शेतकरी आहे. आजही त्याचा आहार १० पोळ्या,भाजी , आमटी भात असा आहे तब्येत उत्तम १२ सूर्यनमस्कार घालतो वरणात तेलाची धार घेतल्याशिवाय होत नाही. हे झालं खेड्यातलं उदाहरण.
काल मी माझ्या मैत्रिणीला व तिच्या नवऱ्याला २० वर्षांनी भेटले. जसेच्या तसे वाटले. कुठलाही रोग नाही मधुमेह किंवा उच्चरक्तदाब. पूर्वीप्रमाणे आजही त्यांचा आवडते जेवण बटाट्याची भाजी व पुरी आठवड्यातून चार वेळा घेतातच. वय ५५-५६ असेल. हे झालं शहरी उदाहरण. त्यामुळे जरा गोंधळात पडायला होत. तरी समतोल आहार घ्यायचा प्रयत्न करते. आहार तज्ञ जयश्री पेंढारकरांचं (आपल्या राहुलच्या सासूबाई) व्याख्यान ऐकलं त्याच्या पटलेल्या अनेक गोष्टींपैकी एक आपल्या मतलबाची/सोयीची सांगते आठवड्यातले ६ दिवस आहारशास्त्र पाळावे व एक मुक्त दिवस म्हणजे एक दिवस हव ते खावं उपासाच्या उलट.