बिच्चारा आनंद. त्या मूर्खाला अशी विनयशीलता, विनम्रता आइनस्टाइनला शोभते, हे त्याला माहीत नव्हते.

उदाहरण आवडले...

खवचट माणसे विनम्रतेच्या भाष्यातही आढ्यता शोधू शकतात हेच खरे!
तसेच विनयाच्या आवरणाचाही प्रौढी मिरवण्यासाठी काही दांभिक मंडळी उपयोग करतात हेही खरेच!!
एखाद दुसरा अपवाद वगळला तर बहुतेकांना खरोखरीची विनम्रता आणि नाटकीपणा यांतला भेद समजतो... त्यामुळे एकूणच नीरक्षीरविवेकाने जाऊन जसे मनाला रुचेल तसे करावे, बोलावे, लिहावे हेच बरे!!!

"उथळ पाण्याला खळखळाट फार" हे स्वतःला समजले असले की पुरेसे...