दिवेकरसाहेब,
स. न. वि.वि.
तुमची शंका खरी असली तर आमचं काम अगदी सोप्पं होईल. अलिकडे हातात पाश घेऊन फिरायची गरजच राहिलेली नाही. शिवाय आता आम्हीही कामगार कपात करायची ठरविली आहे. म्हणजे अर्धवट ज्ञान मिळवून आणि बहुधा प्रत्येक सेमेस्टरमध्ये किमान एक तरी बॅकलॉग ठेऊन पदव्या मिळवणारे तुमचे इंजिनीअर्स आणि स्वतःचं भागवून घेणारे नगरसेवक, आमदार आदी समाजसेवकांनी आमच्या कामगारांचा कामाचा ताण हलका करायला बराच हातभार लावलेला आहे. तेव्हा आमचे दूत आता आम्हांला कमी करावे लागतील. बाकी तुमचं तापमानामुळे होणारे आकुंचन-प्रसरण, दोन भागांमधलं अंतर, क्षेत्रफळ वगैरे तुमच्या इंजिनीअर्स लोकांनाच माहित, आम्हांला त्यात गम्य नाही.
समाजाबद्द्लची तुमची तळमळ पाहून मित्रत्वाच्या नात्याने एक सुचवावे वाटते. श्री. मिलिंद जोशी साहेबांची सूचना तात्काळ अंमलात आणावी. अन्यथा, पुढे मरणाऱ्यांच्या नावानं होणाऱ्या राजकारणांचा आणि आर्थिक मदत देणाऱ्यांचा इतका सुकाळ होईल, की आम्हांलाही मोह व्हावा, मानवी रूपात अवतार घेण्याचा.
बाकी क्षेम.
कळावे.
आपल्या सर्वांचा मित्र,
मी_इ-मृत्यू.