शंकराच्या पिंडीमधल्या उंचवट्याच्या भागाला शाळुंका म्हणतात.
(मात्र मला ह्या शब्दात ळु ऱ्हस्व असायला हवा असे वाटते.)
उदाहरणार्थ- ही झोपण्यापूर्वी म्हणावयाची प्रार्थना-
पडपड कुडी धरणीवरी गंगा भागिरथीच्या तिरी
गयाली गमन प्रयागी मरण
नित्य उठून काशीविश्वेश्वरा तुझे स्मरण
काळभैरव, कपिल, स्वस्ति
पृथ्वी एवढे लिंग, मेरू एवढी शाळुंका
बोलले ते जप, चालले ते प्रदक्षिणा, जेवले ते नैवेद्य
सुपारी खाल्ली की विश्रांत, निजले की साष्टांग नमस्कार
श्री गुरूदेव दत्त।