अशा लेखनाचे प्रयोजन काय? काय साधायचे? हा मिलिंद यांना पडलेला प्रश्न मलाही पडला.

मागे अकलेचे कांदे यांनी सुरु केलेली चर्चा "अंत्यसंस्कार"

दुवाः http://www.manogat.com/node/5590

अशाच गोष्टीवर, की अंत्य संस्काराचे प्रदर्शन...

मग असा लेख लिहुन आपण दुसरे काय करतोय. जर प्रदर्शन नकोसे वाटते तर मग असले लेख कसे पचवायचे.

जगात काही सत्य ही कटु असतात, ती आहेत तशीच त्यावेळी स्विकारावी  लागतात आणि पुढे जावे लागते. जे प्रत्येकजण करत असतो. प्रयेकाच्या आयुष्यात हे घडतेच परंतु ते पुन्हा उद्दृत करावे, लिहुन ठेवावे वर्णन करावे अशी ही घटना नव्हे असे मला तरी वाटते. उगाच नको त्या जखमांवरची खपली निघाल्यासारखे वाटले.

असे लेखन/वर्णन करुन काय साधतो आपण?

मला तरी हे वर्णन/लेखन भावले नाही उलट खटकलेच!

असो,

--सचिन