तात्यांनी लिहिलेल्या प्रतिसादाशी पूर्णपणे सहमत. कलाकार हा अमूर्त कलेला मूर्त स्वरुपात प्रकट करत असतो ते अंतःसामर्थ्याने. संगीत रत्नाकरात "संगीत" शब्दाची व्याख्याच केली आहे,
गीतं, वाद्यं तथा नृत्यं त्रयं संगीतमुच्यते।
ह्या तिन्ही कला मिळून संगीत होत असले तरी तिन्ही कलांना स्वतंत्र अस्तित्व आहे. तिन्ही कलांचा आविष्कार समर्थपणे सादर करणारे कलाकारही श्रेष्ठ आहेत.
केवळ गाण्याचे ज्ञान असते म्हणून वादक किंवा नर्तक पूर्ण कलाकार आणि गायक अपूर्ण कलाकार हे विधान पटण्यासारखे नाहीच. नुसते ज्ञान असणे आणि त्यात परंगत असणे यात फरक आहे. बासरीवादक आपल्या बासरीवादनाने जशी बैठक रंगवू शकतो तशी तो त्याच्या गायनाच्या ज्ञानाच्या आधारे रंगवू शकेल का?अपवादाने दोन्हीत पारंगतता असणारा कलाकार असूही शकतो. एखाद्या कलाकाराने जेव्हा विशिष्ट कलेत प्रावीण्य मिळवलेले असते तेव्हा तो त्या कलेचा आयुष्यभर साधक असतो.उत्तम कलाकार स्वतःला नेहमी अपूर्णच समजत असतो.
माझ्या माहितीप्रमाणे प. गजाननबुवा जोशी जे गायक म्हणूनही नावाजलेले होते आणि प्रसिद्ध व्हायोलिन वादक म्हणूनही.
संगीताच्या गीत , नृत्य, वाद्य ह्या तीन छटा आहेत, असे मला वाटते.
ह्या चर्चेच्या अनुषंगाने संगीत- रत्नाकर मधील अजून एक श्लोक इथे उद्धृत करण्याची इच्छा होत आहे,
नृत्यं वाद्यानुगं प्रोक्तं, वाद्यं गीतानुवृत्ति च।
अतो गीत प्रधानत्वाद् अत्र आदौ एव अभिधीयते॥
अर्थ- गायनाच्या अधीन वादन आणि वादनाच्या अधीन नर्तन आहे, म्हणून ह्या कलांमध्ये गायनाला प्राधान्य दिले गेले आहे.