का तुझा भाऊ गे माझ्या मागुन येतो?
(मी तुझीच मांजर पाळत बसलो आहे)
वाव्वा..
नदीला कधीचा पूर येऊन गेला
मी काठ खुळे कवटाळत बसलो आहे
मला फार आवडली. त्यात असा बदल मला सुचला.
केव्हाच नदीला पूर येउनी गेला
मी खुळा काठ कवटाळत बसलो आहे
मी खुळा की काठ खुळा हे वाचकांवर सोडून द्यावे. बहुधा दोन्ही खुळे असावेत.
मात्रापूर्ती जरी झाली तरी लयही जाता कामा नये, असे वाटते. लयीत वाचून बघावे.
चित्तरंजन