तिन्ही भाग वाचले. न्यूयॉर्क आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे याची देही याची डोळा दर्शन घडले असे वाटले. परदेशातील प्रत्येक गोष्ट पाहताना भारताची आणि भारतातल्या पर्यटन क्षेत्राची, प्रशासनाची आठवण अनावर होणे साहजिक आहे. तिथे ज्या चांगल्या सामाजिक सवयी आपल्याला लागतात त्या भारतात परतल्यावर, 'हा माझा देश' ह्या स्वातंत्र्याच्या भावनेत, सोडायच्या नाहीत. सध्या मी त्या अवस्थेतून जात आहे.
वर्णनाबरोबर छायाचित्रे (छाया चित्रे, नाही) दिसली असती तर दुग्धशर्करायोग म्हणावे लागले असते. असो.