श्री. प्रवासी,
कढईच्या तळाला बटाटेवडे चिकटण्याचे एकमेव कारण (माझ्यामते) कढईतले तेल आवश्यक इतके तापले नव्हते. तेल नीट तापले म्हणजे बटाटेवड्याचे बाहेरील डाळीच्या पिठाचे कवच वडा तेलात सोडल्या बरोबर लगेच शिजते (Set होते) आणि वडा तळाला चिकटत नाही. त्याच बरोबर खालील पथ्ये पाळावीत:-
१) कढई खोल असावी (मोठी नसली तरी).
२) तेल भरपूर घालावे.
३) तेल नीट तापले की वडा कढईच्या मध्यभागी सोडावा. (वडा वर आला की स्वत:हून बाजूला होतो.)
४) तेलाचे वस्तूमान (Volume) पाहून तितके वडे सोडावे. जास्त सोडल्यास तेलाचे तपमान खाली येवून वडे चिकटण्याचा संभव अधिक. (८ इंच व्यासाच्या कढईत एकावेळी जास्तीत जास्त ४-५ वडे टाकावेत.)
५) वडे सोडल्यावर (ते तळाशी बसले तरी) लगेच त्यांना छेडू नये. थोडावेळ थांबून नंतर बाजूबाजूने हलक्या हाताने सोडवून घ्यावेत.
६) कढई स्टीलची किंवा पातळ न घेता, हिंडालिअमची किंवा दुसरी कुठलीही जाड बुडाची घ्यावी.
पाककला ही 'कला' आहे. पहिल्याच प्रयत्नात यश येईलच असे नाही. अनुभवातून उत्कृष्ट वडे करता येतील. नाऊमेद होऊ नये.
शुभकामना.