गायक श्रेष्ठ की वादक हा मुद्दा वादाचा असू नये असे मला वाटते. तरीसुद्धा एक मुद्दा मांडावासा वाटतो.

वादकाला राग आणि तालाबरोबरच वाद्याचे/वादनाचे ज्ञान असावे लागते हा मुद्दा बरोबर आहे. परंतु एक महत्वाची गोष्ट अशी की गायन हे ही एक प्रकारचे वादनच आहे. मानवी शरीराला 'गात्रवीणा' असे म्हटले जाते. गळ्यातून नेमका सूर वा त्याचे variation (मराठी शब्द सुचला नाही, क्षमस्व) दाखवणे हे वाद्याहून अधिक कठीण असते. वाद्यावर सुरांची जागा बहुधा निश्चित असते (अर्थात याचा अर्थ ती कोणालाही सापडू शकते असा मुळीच नाही) त्यामानाने एकच गळा वेगवेगळ्या परिस्थितीत/वेळेस वेगळा प्रतिसाद देऊ शकतो, वाद्याचे तसे नाही. म्हणून गायकालाच थोडे उजवे मानावे लागते. बघा पटतय का.