जीएस्,
नेहमीप्रमाणेच आपले गिरीभ्रमणवृत्त वाचनीय आहे. आम्ही फक्त वाचतोच. वाचतानाही चक्कर येते आणि दुर्गमतेच्या कल्पनेने पायात गोळे येतात. नुकताच रायगडचा दौरा केला. (अर्थात गाडीने). त्यावेळी रज्जूमार्गाने (रोप-वे) गडारोहण केले. तरीही, गडाची उंची, भव्यता, विशालता, दुर्गमता इत्यादींनी भोवळ आली. पण त्यातही थ्रिल होते, मजा होती. फोटो काढलेले नाहीत पण शब्दचित्र 'मनोगतावर' देण्याचा मानस आहे.