आपले लेख रंजक आहेत.  काही विचार देत आहे. (कॉमेंट्स)

दगडी पुलाच्या कमानी अर्धवर्तुळाकार नसून परवलयाकृत (पॅराबोला शेप) असतात.  या आकृतीचे विशेष म्हणजे यात सर्व दगड दबावाखाली (काँपेशन मध्ये) येतात.  तणावामध्ये येत नाहीत. (टेन्शन).  दगड, तसेच सिमेंट/काँक्रीट (प्रतिशब्द माहीत नाही) हे दबावाविरूध फार ताकदवान असतात पण तणावाविरुद्ध फारच कुचकामी असतात.  त्यामुळे लोखंडी सळया वापरून तणावाचा भार लोखंडाने आणि दबावाचे काम काँक्रीटने सांभाळले जाते.  या कमानीतला मध्यावरचा दगड हा सर्वात महत्वाचा असतो.  त्याची योजना आणि आकार हा फार कौशल्याने करावी लागते.  कमानीच्या दोन टोकापासून येणारे एकामेकाविरुद्ध जोर (फोर्सेस) इथे एकमेकाशी भिडून संतुलीत (बॅलन्स)  होतात.   या दगडाला कीस्टोन (keystone) असे म्हणतात.  ग्यानबाची मेख म्हणा ना!

यावरून आठवलेः  अमेरिकेतील राज्यांना काहीतरी विशेष नावे दिली जातात.  कॅलिफोर्निया=गोल्डन स्टेट; फ़्लॉरिडा =सनशाईन स्टेट, वॉशिंग्टन = एव्हर ग्रीन स्टेट वगैरे.  न्यू जर्सीचे टोपण नाव आहे Keystone State.  तेरा राज्यांनी १९७६ साली इंग्लंडचे जोखड झुकारले आणि स्वातंत्र्य जाहीर केले.  त्यांची पहिली बैठक झाली तेव्हा प्रत्येक राज्याने स्वातंत्र्याच्या बाजूने मत दिले.  ती मते अकारविल्हेवारी (अल्फाबेटिकली) घेतली गेली.  त्यांत न्यू जर्सी हे तेरापैकी सातवे मत होत, म्हणजे त्यांच्यामताने बहुमत पूर्ण झाले.  त्यामुळे त्या राज्याचे टोपण नाव Keystone State पडले.  आज ४ जुलै म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्यदिवस आहे तेव्हा ही गोष्ट सांगणे वावगे ठरू नये.  अर्थात हे विषयांतर होत आहे हे माहिती आहे.

कलोअ,
सुभाष