तसे पाहता अश्या मंदिरांवर स्त्रियांनीच बहिष्कार टाकावा. (आपापल्या ताब्यातील पुरुषांनाही तिकडे फिरकू देऊ नये!)  -

हा विचार एकदम पटला.

यत्र पुज्येत नारी, तत्र लक्ष्मी वसे.

आहो देवाला पुरुष आणि स्त्री दोन्ही सारखेच की, आणि स्त्रियांना प्रवेश नाही याला फारसा काही शास्त्रीय आधार नसावा ( जो सांगितला जातो त्यात काही शास्त्रीय तथ्य आहे असे मला नाही वाटत). आहो धर्म जर का येवढा संकुचित विचाराचा असता तर , "देवीचे" एक हि मंदिर नसते. आई हि माते समान मानणाय्रा आपल्या धर्मात अश्या प्रकारची बंधने असावीत हे चुकीचे वाटते.

मंदिर प्रवेशा साठी नियम असावेत पण "जात/लिंग/वय/वंश" या आधारावर भेद करता कामा नये.

हाच नियम मशीदींना हि लागू व्हावा. तसेच चर्च/मंदिर/मशीद इथे पुरुषच मुख्य आचार्य का असतात , स्त्रिया का नाही? (हिच चर्चा केवळ हिंदूच रीती/रिवाजच किती मागास विचाराचे आहे या दिशेला जाऊ नये म्हणून हा मुद्दा).