अश्या बातम्यांची तटस्थपणे पडताळणी केल्याशिवाय आपले मत ठरवू नये आणि निष्कर्षावर पोहोचण्याची घाई करू नये असे वाटते. डोळे झाकून विश्वास ठेवावा इतपत आजकालची प्रसारमाध्यमे विश्वासार्ह राहिलेली नाहीत.

सध्या केरळमधील एका अभिनेत्रीने अशा मंदिरात प्रवेश केल्याची बातमी गाजते आहे.

ह्या बातमीबद्दल मला माहिती नाही, पण केरळमधील प्रमुख मंदिरांमध्ये (अनंतपद्मनाभ, गुरूवायुर इ.) महिलांना प्रवेश आहे. या मंदिरांमध्ये हिंदू नसलेल्यांना मात्र प्रवेश नाही, मग ती व्यक्ती स्त्री असो अथवा पुरूष. (या मागे धार्मिक भेदभाव हे कारण नाही. हिंदू धर्माविषयी ज्यांना आदर आहे अश्यांनाच प्रवेश मिळावा यासाठी ही योजना आहे असे वाटते.)

लोकसत्ताच्या त्या लेखात पुरीच्या मंदिरात इंदिरा गांधींनाही त्यांच्या आंतरजातीय विवाहामुळे प्रवेश नाकारल्याचा संदर्भ आला आहे.

इंदिरा गांधींना, त्या स्त्री होत्या म्हणून प्रवेश नाकारला नाही असेच लेखकाचे म्हणणे दिसते.

या सर्व घटनांमागील कारण मीमांसा काय असावी? माझे एक मत देऊन मनोगतींची मते अपेक्षित आहे.

सदर वृत्त आणि अश्याप्रकारची इतर वृत्ते देण्यामागे, सवंग प्रसिद्धीचा हव्यास, वृत्तपत्राचा खप वाढवणे, समाजात खळबळ पसरवणे, हिंदू धर्मावर टिका अशी आणि यासारखी बरीच कारणे असू शकतात.

शाक्तपंथात, दत्त/नाथपंथात स्त्रियांना मंदिर प्रवेश निषिद्धः नाही.

थोडक्यात आपले मत बनवण्यापूर्वी आणि ते प्रकट करण्यापूर्वी काळजी घेणे चांगले. शिवाय सार्वजनिक मंचावर चर्चा सुरू करताना शक्यतो तटस्थ आणि खात्रीशीर माहिती देणे आवश्यक आहे.

भारतात शाक्त संप्रदायाच्या अनुयायांनी मदिरा, मदिराक्षीच्या भोगाचा पुरस्कार केला होता. (अनेक साधू-संन्याशी भांग पितात वा चिलीम ओढतात हे याच गोष्टीचे अवशेष आहेत.)

देवीचे (शक्तीचे) भक्त ते शाक्त म्हटले जातात. बळी देण्यासारख्या प्रथा शाक्तपंथीयांमध्ये चालत असत पण देवीची भक्ती करणारे मदिराक्षीच्या भोगाचा पुरस्कार करायचे हे पटण्यासारखे नाही.