वरील हझल किंवा विडंबन कुठल्याही उदात्त हेतूने प्रेरित नाही, हे आधीच सांगून टाकतो. मूळ गझल छानच आहे. ती गुणगुणत असताना 'ढुरढूरढूर झाली' आहे. म्हणजे ही हजल मी पाडली आणि टाकली. छोट्या वृत्तांत गझलांचे/कवितांचे बेसुमार पीक घेता येते हे मात्र खरे. पुरेपूर प्रयत्न केल्यास साधारणपणे दिवसाला २० असे उत्पादन घेता येईल, असेही मला दाखवायचे असावे.

गझलेच्या/कवितेच्या वृत्ताच्या छोटेपणामुळे किंवा मोठेपणामुळे ती छोटी किंवा मोठी ठरत नसते हे देखील पुन्हा एकदा सांगावेसे वाटते.

उगाच भलत्या-सलत्या शंका, कुशंका नकोत म्हणून हा प्रतिसाद.