प्रियाली,

भावी आयुष्याचा पूर्ण विचार न करता भावनावेगात महत्त्वाचे निर्णय घेतल्यास ते चुकूही शकतात आणि तसे ते चुकल्यानंतर किती भयंकर परिस्थितीत नेऊन पोहोचवू शकतात याचं खूपच भावस्पर्शी चित्रण केलं आहे. मोकळेपणाने भावना व्यक्त न करणाऱ्यांच्या मनात नक्की काय असतं हे जोखणंही खूप अवघड असतं म्हणतात ते काही खोटं नाही. अंतर्बाह्य बदलवणारी गोष्ट घडून गेल्यानंतर त्यापुर्वी घडलेल्या घटनांना अचानकच कसे अर्थ प्राप्त होतात. नाही?