चक्र-पाणी,
श्री. चित्त ह्यांनी उपस्थित केलेला विचार-गुरुत्वाचा मुद्दा समजायला फारसा कठीण नाही असे वाटते. त्या शब्दांमधेच त्याचा अर्थ दडलेला आहे, गुरुत्वाचा जो प्रचलीत अर्थ आहे तो साधारणतः 'वजन' असा आहे. विचार-गुरुत्व म्हणजे विचारांचे वजन, साहजिकच! (म्हणजे गझलेत व्यक्त झालेला विचार किती दमदार आहे ते). अणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे गझलेत व्यक्त झालेला विचार जर मुळातच दमदार असेल तर मग शब्दांची थोडीशी ओढाताण झाली तरी समजण्यासारखी आहे, म्हणजे तो विचारच इतका दमदार असतो की शेरातील शब्द जरी चपखल नसतील तरी तो शेर प्रभावी ठरतो, फक्त विचारांच्या वजनामुळे!
मानस६