हे एका शवाचे आत्मवृत्त आहे असे म्हणता येईल. अर्थातच आत्मवृत्त लिहिताना एखादी निर्जीव वस्तू सजीव होऊन बोलू लागली आहे अशी कल्पना करून लेखन केले जाते. या संकल्पनेस धरून हे लेखन आहे असे म्हणता येईल.
पण या लेखाने एक वेगळाच प्रश्न समोर येतो. अर्थात हा काही नवीन प्रश्न नाही. गेली शेकडो-हजारो वर्षे विचारवंतांना या प्रश्नाने भेडसावले आहे असे दिसते. तो प्रश्न म्हणजे
"कोऽहम्" ... "मी कोण?"
मी म्हणजे हे शरीर का?
... नसावे कारण आपण म्हणतो 'माझे' शरीर!
मी म्हणजे हा मेंदू का?
... नसावा कारण आपण म्हणतो 'माझा' मेंदू!
मी म्हणजे हे मन का?
... नसावे कारण आपण म्हणतो 'माझे' मन!
मी म्हणजे हा आत्मा का?
... नसावा कारण आपण म्हणतो 'माझा' आत्मा!
कोऽहम्?