आपले प्रतिसाद वाचुन खरंच बरं वाटलं !! कोणीतरी आहे ज्यांना मी मनातलं काही सांगू शकतो !!!
प्रथम तुमच्या प्रतिसादांना उत्तरे देउन सुरुवात करतो.
भटका - मराठी आणि हींदि गाणी म्हणणं हे मी लहान असल्यापासुन करतोय, मी "जिंदादिल" आहे लग्नानंतर ८ वर्षानंतर म्हणूनच परत त्याच गेहेराईने प्रेम करू शकलो. मी निराश वगैरे अजिबात नाही बरं का !!!
छन्द - बायकोला पटवताना मी पहिलं प्रेम केलं आणि करतच राहिन तसचं कायम!! पण आता ८ वर्षांनी ती भेटली आणि ... खरं तर मी कधी मुली किंवा स्त्रियांशी बोलण्याचा काही विशेष संबंध येत नाही... पण "मित"शी का बोलावसं वाटलं हे सांगता येत नाही... अभ्यास करायच्या वेळी बाकी काही न करता अभ्यासच केला हो आम्ही... म्हणुनतर नाही ना !!! बरं आणि हे सगळं इथे अमेरीकेत, इतक्या दुर का व्हावं !!! इथे इतरही सुंदर भारतिय मुली आहेत, त्यांच्याशी माझं कधी साधं hi !! पण होत नाही...
अनुप्रिता - तुमच्या आणि आमच्या नावात एका "आ"चा फरक !! असो..
मी २२ चा नाही... ३२ चा आहे.. २ मुलांचा बाप पण आहे.. (वयं - ५ आणि ३). तुम्ही म्हणता ते खरं आहे... मी पहिलं प्रेम त्याच वयात केलं माझ्या बायकोवर.. पण आता "मित" वर पण आणि तीसुद्धा!! "मित" पण २ मुलांची आई आहे, तिचंपण तिच्या husband वर प्रेम आहे.. पण तिची अवस्थाही माझ्यासरखीच आहे !!!
अज्जुका - hmmm!! the movie is not that good but it's a fact.
आम्हाला दोघांनाही कळत नाहीये की आम्ही का एकमेकांना contact केल्याशिवाय राहू शकत नाही ते ! enjoy तर दोघेही करतोय कारण दोघेही हे पहिल्यांदाच करतोय !
आम्ही ठरवलं होतं की आता हे सगळ बासं झालं...आता अजिबात no mail, no Phone, no meeting.. we did it for 2 weeks.. but.. फार वाईट गेले ते दिवस दोघाना... परत सुरु केलं एकाच दिवशी दोघांनीही...
क्रमशः थोड्या वेळानंतर .....