अनुचे मत एकदम बरोबर आहे. मला वाटत पुर्वी एकदा यावर चर्चा झाली आहे. मराठी गुण दोष सगळ्यांमधेच असतात. (दोषांचे समर्थन करण्यासाठी नाही), पण आज पर्यंत किती परप्रातीय आले आहेत इथे? का आले? आणि इथे आल्यावर ते स्वतःचा स्वभाव सोडतात का? इतर कोणत्या राज्यांमध्ये अशी हॉटेल्स वा स्टेशन्स जवळ अशी व्यवस्था आहे जिथे खास मराठी पद्धतीचे जेवण वा पदार्थ मिळतात? आम्ही मात्र प्रत्येक ठिकाणी त्याना हवे असणाते डोसे अन पराठे अन काय काय सर्वत्र देतो अन स्वतः खातो. अश्या लोकांना जे मराठी लोकांचा काडीचा सुद्धा विचार करत नाहीत त्यांच्या साठी स्वतःच मराठमोळपण सोडुन द्यायच?

मला वाटत प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. मला कन्नड तमीळ पेक्षा जर्मन भाषा शिकायला जवळची वाटते पण आम्ही परदेशात त्यांना भारतीय म्हणुन जवळ घेतो.

मुद्दा हा कि मराठी आणि अमराठी पेक्षा भारतीय बनुन विचार करायची जास्त गरज आहे.

मराठा दिल्ली पर्यंत गेला आहे राज्य करायला हा इतिहास आहे. मराठी लोकांना अमराठी लोक पुढे येवु देत नाहीत हे मोठे वास्तव आहे. अपवाद असतीलही. मराठी लोक एकमेकांचेच पाय खेचतात हे त्याहुनही मोठे वास्तव आहे.

मराठी चाणक्य