तात्यांचा तंबोऱ्यावरील प्रतिसाद आणि भाषरावांची पुरवणी... दोन्ही प्रतिसाद सुंदर माहिती देतात.

भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेतला सोनॉमीटर या एकतारी उपकरणाचा प्रयोग आठवला. यात ट्यूनिंग फोर्क (मराठी?) शी तारेची वारंवारिता जुळवण्याचा (तारेवरचा ताण आणि झंकारणारी लांबी बदलून) प्रयत्न करताना 'कागदी घोडे' आणि 'कानसेन'(धन्य ते पंडीत सर!) अश्या दोन पद्धती वापरायचो. त्याची आठवण झाली.

यातली कानसेन पद्धत तंबोरा जुळवण्याच्या जवळची आहे असे वाटते. अर्थात तंबोरा जुळवणे हे फारच जिकिरीचे, अभ्यासाचे आणि प्रयत्नाचे काम आहे. त्यामानाने सोनॉमीटरचा प्रयोग अगदीच लिंबूटिंबू होता असे म्हणावे लागेल.