'लाजवू दे' ह्या वापराबद्दल मी एका विदुषींना विचारले असता त्यांनी खालील उत्तर दिले, जे पटते--

कर्मणी क्रियापद असेल तर लाजवू दे व्याकरणदृष्ट्या बरोबर होईल. मात्र अभिप्रेत अर्थाच्या दृष्टीने लाजू दे हे योग्य. लाजू दे मध्ये लाजणे आहे. लाजवू दे मध्ये लाजवणे आहे. लाजवणे चा अर्थ लाज आणणे जो नकारात्मक घेतला जातो. पाहुण्यांसमोर दंगामस्ती करून मुलाने मला लाज आणली. ह्यामध्ये मी लज्जित होत नसते तर शरम+राग असे मिश्रण असते.

--- इथवर पटले.

 तसे हे लाजवणे वाटले. दीप मालवू दे, डास घालवू दे ह्यामध्ये मला जी गोष्ट करायची आहे त्यात तू आडकाठी आणू नको असा अर्थ असतो. त्यामुळे लाजवू दे मध्ये १. मला लाजायचे आहे, तू आडकाठी करू नकोस २. त्यांच्या मिठीने मला (तुला) लाजवायचे आहे, असे दोन अर्थ निघतात, जे दोन्ही अपेक्षित अर्थ नाहीत असे वाटते.

--- दुसरा अजिबात अपेक्षित नाही; पहिलाही तितकासा नव्हता, पण तो अर्थ निघू मात्र नक्कीच शकतो.

एकूणात तुमचा लाज़वण्याबद्दलचा मुद्दा "कन्विन्सिंग" आहे आणि म्हणूनच मला मान्यसुद्धा आहे!


ह्या आधीच मुद्दे (ओघवतेपणा वगैरे) आता पुन्हा चघळत बसत नाही. तुम्हाला त्या ओळींत अगोड, अजीर्ण वाटलेले नाही, खटकलेले नाही. प्रश्नच मिटला. शब्दांचा क्रम इत्यादी बाबतींतही म्हणून मी वाद घालत बसत नाही. माझेच कान जास्तच संवेदनशील असावेत.

--- १) मी वाद तर घातलाच नव्हता; फक्त मला ए स्पष्ट करायचे होते, ते मोकळेपणाने मांडले होते  आणि २) याबाबत मला काय म्हणायचे होते, ते मी आधीच स्पष्ट केले असल्याने (तुम्हाला वाटलेला) वाद (आणि मला वाटलेली चर्चा) ताणण्याची माझीही इच्छा नाही.

असो, एकंदर मला जे खटकले ते तुम्हाला अजिबात खटकत नाही आणि तुम्हाला मला काय म्हणायचे आहे ते कळत नाही, हे माझे दुर्दैव. त्यामुळे विचारगुरुत्वावरील चर्चा तूर्तास तहकूब करतो. :)

--- ह्म्म्म ह्म्म्म खटकाखटकीबद्दलचे आणि समज़ण्या अगर न समज़ण्याबाबतचे दुर्दैव खरोखरच दुर्दैवी आहे. गुरुत्वाबद्दलचे स्पष्टीकरण मानसरावांनी दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार. मात्र मुद्दा तुम्ही मांडल्याने आणि गझल माझी असल्याने तुम्ही तो पूर्ण समज़ावला असता तर अधिक आनंद झाला असता. असो.

पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
--- धन्यवाद. आपल्यासारख्या अनुभवी व्यक्तीकडून असेच बहुमोल मार्गदर्शन पदोपदी लाभो, ही प्रार्थना कम् अपेक्षा.