गिरिशिखरे वनमालाही, दरी-दरी घुमवित येई,

कड्यावरूनि घेऊनि उड्या, खेळ लतावलयी फुगड्या,

घे लोळण खडकावरती, फिर गर-गर अंगाभोवती,

जा हळूहळू वळसे घेत, लपत-छपत हिरवाळीत,

पाचुंची हिरवी राने, झुलव झुले मंजुळ गाणे,

वसंत मंडप वनराई, आंब्याची पुढती येई.