सर्वांना धन्यवाद.
पालीजवळचा तो सरसगड.
घन इंधनाचा स्टोव्ह म्हणजे फक्त भांडे ठेवता येईल असा छोटा फोल्डिंग स्टँड आणि खाली त्याला इंधनाच्या वड्या ठेवायला जागा असा प्रकार असतो. हा स्टँड फोल्ड केल्यावर कंपासपेटीएवढा होतो. कॅरमच्या सोंगटीपेक्षा थोडी लहान पण जास्त जाड अशी एक वडी असते जी दहा मिनिटे पुरते. त्यावर कितपत गरम होईल अशी शंका होती म्हणून मी आधी घरी एका वडीवर कितपत पाणी तापते ते बघून त्याप्रमाणे योजना केली होती. एका पंचवीस रुपयाच्या पाकिटात चार वड्या असतात. काडी लावल्यावर वडी लगेच पेट घेते.
साधारण सोळा प्लेट पोह्यांना पाच वड्या लागल्या तर अडीच तीन लिटर रस्सा उकळायला दहा वड्या लागल्या. (मसाला आरतीने अगोदरच भाजून आणला होता). एका वेळेला दोन- तीन वड्या ठेवल्यास पुरेशी उष्णता निर्माण होते.