समाजच्या चालीरीती प्रत्येक शतकात बदलतात. त्यांचा कितपत अंगिकार करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मागेही एकदा हा मुद्दा चर्चेत आला होता. आपल्याकडे लग्न झाले की एका प्रकारचा प्रतिष्टीत शिक्का मिळतो. मग लग्नानंतर भलेही त्यांचे पटो न पटो.
मी जेव्हा जेव्हा सुट्टीत भारतात जातो तेव्हा मला हा प्रश्न सगळिकडे विचारला जातो.
"काय, लग्न कधी करतोस? सेटल कधी होतोस?" अशा वेळी मी फ़क्त विचारणार्याचा क्रमांक मोजतो. प्रत्येक वेळी स्कोअर गेलाबाजार ५० नक्कीच होतो. ः-)
लग्न हीच आयुष्याची एकमेव गरज आहे का?
माझ्या मते आपल्याला जुनी मते तपासून पाहण्याची गरज आहे.