शेवटी पाऊस पडावा, गाड्या बंद पडाव्यात आणि त्या निमित्ताने घरी रहायला मिळावे हे ही बऱ्याच मुंबैकरांचे स्वप्न असते.

या विधानाशी मी तितकासा सहमत नाही.

कधीकाळी मुंबईत जन्माला आलो आणि त्यानंतर (पुन्हा कधीकाळी) मुंबईत नोकरीनिमित्ताने काही महिने काढले एवढ्या भांडवलावर स्वतःला मुंबईकर म्हणवू इच्छीत नाही, आणि एरवी मुंबईचा अनुभव अधूनमधून जाऊनयेऊन आणि मुंबईकरांच्या भावनांची तोंडओळखसुद्धा केवळ मुंबईकर नातेवाईकांकडून ऐकल्यामुळे - म्हणजे सेकंडहँडच - आहे, त्यामुळे मुंबईकरांच्या स्वप्नाविषयी अधिकारवाणीने बोलू शकत (आणि इच्छीतही) नाही, पण कामावर गेल्यानंतर पाऊस पडून गाड्या, बसेस आणि टॅक्सीसुद्धा बंद झाल्याने अडकून पडलेल्या मुंबईकराचे हे स्वप्न असेल, असे वाटत नाही.

- टग्या.