एकसे बढकर एक शेर...
सोबती जन्मांतरीचे साथ देणारे दुरावे..वाहवा!
एक रस्ता, दोन फाटे, तू फुलांचा माग घ्यावा
आग्रही काट्याकुट्यांचे मी निमंत्रण आदरावे
देहवीणेला गवसणी घालणारा शिशिर येता
चेहऱ्यावर चोपडावे का वसंताचे गिलावे.. शेर खुपच वेगळा, आशयाच्या दृष्टीने चिंतनपर!
मीलनाचा आपल्या क्षण का असे मिंधा तिथीचा
सागराची साथ देता का नदीने बावरावे
लाजण्याचा उंच किल्ला, रोजची माझी चढाई
संयमाचे बुरुज आता एकदाचे शरण यावे
ये सखे आच्छाद मजला, प्रीतिचा वर्षाव कर तू
होवुनी आषाढझड ये, फक्त रिमझिम आग लावे... तीनही शेर एकाहुन एक सरस! अभिनंदन!
-मानस६