मी शाळेत "माझा आवडता ऋतू" म्हणून 'उन्हाळ्यावर' निबंध लिहिला होता. आणि अगदी असेच विचार मांडले (पण वात्रटा इतके चांगले नाहीत) मला कमी मार्क मिळाले. कदाचित शिक्षकांना नेहमीचे पठडीतले ऋतू (म्हणजे वसंत, वर्षा) अपेक्षित असावेत.
लेख प्रचंड आवडला. माझिया जातीचा कोणीतरी निघाला याचा आनंद जास्त झाला. दुपारभर पत्ते खेळणे म्हणजे अवर्णनीय. झब्बू खेळताना एखाद्या 'सज्जना' ला २ 'दूर्जनां' मधे बसवून त्याच्या पिळवणूकीचा आनंद कधी लुटला आहे? मी आणि माझा भाऊ हे काम अत्यंत आनंदाने करायचो. मागच्याच वर्षी आम्ही परत खेळलो. अजूनही आमचा 'वट' कायम आहे.