हल्ली अशा घटनांचे प्रमाण कमी झाले असेल तर आनंदच आहे, पण ही घटना काही फार जुनी नाही. अडीच-तीन वर्षापूर्वीचीच आहे.
तुम्ही म्हणता ते खरे आहे. सुनिताचा सगळा त्रास टळला असता जर प्रवीणच्या आई-वडिलांनी वेदाशी लग्न करायला विरोध केला नसता. निदान सुनिताच्या कुटुंबाला ह्या गोष्टीची कल्पना दिली असती तरी कदाचित सुनिताचं लग्न त्याच्याशी झालं नसतं.
मी म्हटल्याप्रमाणे, सुनिता खरंच नशिबवान आहे की तिला आधार देणारं कुणीतरी होतं. प्रवीणनं २-३ प्रसंगी तिला थोबाडात मारली होती, पण ते सोडले तर तसा तिचा शारिरीक छळ केला नव्हता. पण काही मुलींचं नशिब इतकंही चांगलं नसतं. सुनिता सवेरामध्ये जायची तेव्हा तिथे एक मुलगी येत असे. तिच्या नवऱ्याने तिला इतकी मारहाण केली होती की तिचं पूर्ण शरीर लुळं पडलं होतं. आता तिचा घटस्फोट झाला आहे, पण आयुष्यभर परावलंबी जीणं तिला जगावं लागणार आहे आणि ही घटनादेखील तीनेक वर्षापूर्वीचीच आहे.
मैथिली