कथा वाचून अंगावर काटा आला. सुनिताचं पुढचं आयुष्य तरी बरं जावं ही प्रार्थना. दुसऱ्या भागापर्यंत वाचून वाटलं होतं की सर्वकाही ठिक होईल आणि कथेचा शेवट सुखान्त होईल. हे सर्व भितीदायक आहे. परक्या देशात पराधीन व्हिसावर आलेल्या मुलींचं असं पण होऊ शकतं? अजूनही कित्येक कुटुंबात 'अमेरिकेचा मुलगा आणि मुलीला अमेरिकेत संसार मिळाला म्हणजे सर्व आलबेल झालं' अशी समजूत आहे. वरसंशोधनात खुद्द मी दोनतीन 'फ्वारीन' ची मुलं पाहिली आहेत. एका ठिकाणी कोपऱ्यात उभ्या असलेल्या तंबोऱ्याला सतार म्हटल्याने आणि 'जी आर ई मधे पास होऊन चांगल्या महाविद्यालयात स्वतःच्या कुवतीवर आणी खर्चावर प्रवेश मिळवण्याची तयारी आणि क्षमता आहे का' या प्रश्नाला 'प्रयत्न करेन पण आता नक्की खात्री देता येत नाही' असे उत्तर दिल्याने पत्ता कटला. (सविस्तर माहिती अशीच एक बघाबघी येथे वाचा.)
अशीच आणखी एक मैत्रिण मुले पाहत असताना एक अमेरिकास्थित मुलगा पहायचा योग आला. ती आणि आईवडील त्या मुलाच्या घरी गेले. गेटावर वॉचमनने 'ते खाली येतील. बागेत बसा.' अशी विनंती करुन बागेत बसवले. बागेत वाट पाहत असताना एक मुलगी व पालकद्वय बाहेर पडताना दिसले. त्यानंनत गेटावर दूरध्वनी आला आणी वॉचमनने आत जाण्यास सांगितले. आत साधारण २५ मिनीटाची भेट झाल्यावर चुळबूळ सुरु झाली आणि त्यांना निरोप देण्यात आला. ती व तिचे कुटुंबिय बाहेर पडत असताना आणखी एक मुलगी-आई बाबा त्रिकूट बागेत बसलेलं दिसलं! (वेळापत्रक बरंच टाईट असावं. एका दिवसात १० मुली वगैरे..)
एकंदरीत अपवाद असले तरी संभाळून आणी चौकश्या करुन पावले टाकणे योग्य असे वाटते.