रस्त्यावर ज्या सरकारी पाट्या आढळतात त्या खालील प्रमाणेः-

१) गतीरोधक पुढे आहे. (ह्याचा अर्थ होतो 'इथे उगाच वेग कमी करू नका)
खरी पाटी अशी पाहिजे
 'पुढे गतीरोधक आहे' (ह्याचा अर्थ होतो, 'वेग आटोक्यात आणा, पुढे अडथळा आहे.')

२) धोक्याचे वळण पुढे आहे. (इथे घाबरू नका)
पुढे धोक्याचे वळण आहे.

३) अपघाती क्षेत्र पुढे आहे. (इथे अपघात करू नका, तिथे जाऊन करा.)
पुढे अपघाती क्षेत्र आहे. (धोका टाळण्यासाठी वाहने हळू चालवा)

अशा अनेक पाट्या वाचावयास मिळतात. करमणूक होते.