मैथिली, लेखिकेची प्रतिभा नाही म्हणालात पण छानच केलं आहे तुम्ही सत्यकथन. तुमचं अजून लेखन वाचायला नक्कीच आवडेल. थांबू नका... लिहीत रहा.
हा भाग सुनिता(शेवट) नाही तर सुनिता(सुरूवात) आहे असंच म्हणावंसं वाटतं. आयुष्यात अशा प्रसंगांनी खचून न जाता नव्या हिंमतीने उभे राहायला शिकायला पाहिजे. जवळच्या नातलगांनी, दोस्तांनी संबंधित व्यक्तीला खंबीर बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जो केलेला आसपास दिसत नाही.
मला वाटते, आजकालच्या मुलींना जर स्वतःच्या पायावर खंबीर उभे राहू देत नसतील किंवा तसे होण्याची गरज जाणवून देत नसतील तर ती त्यांच्या पालकांची चूक आहे आणि सगळे काही असूनही स्वतःची शक्ती ओळखू इच्छित नसतील तर ती त्या मुलींची चूक आहे असे मला वाटते. स्वतःला ओळखणे हे कुठल्याही व्यक्तीचे आद्य कर्तव्य आहे असे मला वाटते. सुनिताने आता स्वतःला ओळखलंय.. तिचं आयुष्य यापुढे फुलेलच यात मलातरी शंका नाही. फुटक्या नशिबाचा तर प्रवीण आहे, जो सुनिताला स्वतःच्या आयुष्यात टिकवू शकला नाही. कीवसुद्धा येत नाही मला त्याची. पुअर.. व्हेरी पुअर फेलो !