आपल्याश्रीयुत द्वारकानाथ,

 आपल्या माहितीतल्या व्यक्तिंची मृत्युघटना ही प्रत्येकाला नेहेमीच अस्वस्थ करते. दुसर्‍याला तत्वज्ञान शिकवणे सोपे आहे, तरीही तुमच्या आयुष्यात घडलेल्या या दुर्घटनांना कसे सामोरे जाता येइल याबद्दलचे काही विचार पुढे मांडत आहे.  त्या मागची सहानुभूतीची भावना लक्षात घ्या ही विनंती.

गीतेमध्ये सांगितले आहे कि,

जातस्यहि धृवोर्मृत्यु

त्याप्रमाणे प्रत्येकाचा मृत्यु हा ठरलेला आहे. तेव्हा अशी घटना घडली कि त्या व्यक्तीने आपले आयुष्य कसे घालवले ते पाहायचे.  त्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी काय होत्या, त्यांच्या सहवासातले कुठले Positive गुणधर्म होते त्याची अधिक आठवण करावी.  तसेच सद्यपरिस्थितीमध्ये आपल्या कुठल्या वागण्याने ती व्यक्ति समाधानी झाली असती हा विचार करावा. आणि त्याप्रमाणे कृती करावी.

अशा विचाराने त्या व्यक्तीची एक चांगली आठवण आपण बाळगत असतो.  तसेच त्याच वेळी आपल्यामनामध्ये असलेली कार्ये पुरे करिण्याची आपल्याला प्रेरणा मिळते.

माझ्या या लिखाणाचा आपल्याला थोडा तरि उपयोग व्हावा हीच ईच्छा आहे.

कलोअ,

परभारतीय