भारतात क्रिकेट नावाचा विषवृक्ष चांगलाच फोफावला आहे. या विषवृक्षाखाली बाकीचे खेळ कसे बहरणार?

क्रिकेट हा कसोटी असेल त ५ -५ दिवस आणि एकदिवसीय असेल तर तब्बल ७ तास चालतो. प्रत्येक षटकानंतर जाहिरातीची संधी. यामुळे प्रायोजक कंपन्यांनी क्रिकेटला चांगलाच हात दिलाय.

फुटबॉल मध्ये ९० मिनिटात खेळ खलास. जाहिराती फक्त १० मिनिटे.

वारा वाहेल तशी पाठ अशी एकंदर वृत्ती देशात असल्याने क्रिकेटही त्याला अपवाद नाही. क्रिकेट आवडत नाही अशातला भाग नाही पण त्याला काहीतरी मर्यादा हवी. थोडक्यात इथे प्रत्येकाला सचिन व्हायचे आहे. १०० कोटीमध्ये प्रत्येकाला ही संधी कशी मिळणार?

ऑलिंपिक मध्ये आपण जेमतेम एक पदक आणू शकतो. क्रिकेटला तर ऑलिंपिक मध्ये स्थानच नाही. कधी प्रचंड लोकसंख्या तर कधी गरिबी अशी कारणे आपण देत राहतो. या सर्व बहाण्यांना चीन हे एक सणसणित उत्तर आहे.