मैथिली,

आपली लेखन शैली सहज, ओघवती आहे. छान लिहीलेय. पुढील  लेखनासाठी शुभेच्छा!

दुसरा भाग संपला तेव्हा मन सुखावले होते, चुकुन तुम्ही समाप्त लिहायला विसरले की काय? असे वाटले...

असा क्रुर शेवट (कथेचा) होईल अशी पुसटशी कल्पना आली नाही.

खरेतर यात केवळ "अमेरिकेत" राहणारे वगैरे चा फ़ारसा संबंध आहे असे वाटत नाही. एकुणच अशा "वृत्ती" कुठेही असलेतरी घात करणारच!

आपणच सावधान राहुन वागणे चांगले.

एका मध्यमवर्गीय तेलुगु कुटुंबातून आलेली ही मुलगी.. मुलगा अमेरिकेत असतो ह्याने तिचे आई-वडील आणि ती स्वतः देखील हुरळून गेली होती.

सुनितासारख्या किती तरी अश्राप मुली अमेरिकेच्या ओढीनं

आपण कथा ज्या रितीने लिहिली त्यावरुन तरी सुनिताला अमेरिकेची ओढ होती असे वाटत नाही तिला हवा होता "तिचा सखा" ...  (चु. भु. द्दा. घ्या.)

असो, ही कहाणी आपण मांडली हे खरेच चांगले केले, यातुन नविन लोक, जे आयुष्याच्या "या वळणावर" असतील ते नक्कीच काही अंशी सावध होऊन बोध घेऊन पाउले टाकु शकतील...

पुनः एकदा तुमच्या लेखनास शुभेच्छा!

--सचिन